कवठे येमाई (पुणे) :
मुंबई शहरात स्थायिक असलेल्या कुंटुबाच्या जावयाने शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील आरोग्य केंद्राजवळ सोडलेले आजी आजोबा व त्यांच्या दोन नाती, अशा चौघांपैकी तिघे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.
आजी आजोबा व त्यांच्या दोन नातींना (ता. आंबेगाव) साकोरे येथील जावयाने मुंबई मधून कवठे येमाई येथे आणून शुक्रवारी (ता. 15) ला पहाटे सोडले. या आजी आजोबांचे गाव कवठे येमाई आहे .ते गावात आलेवर आरोग्य उपकेंद्र आवारात झोपले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कट्टीमनी व डॉ. नामदेव पानगे यांना हे समजताच त्यांनी आरोग्य केंद्र सॅनिटाइझर करुन घेतले. आणि सबंधितांची आरोग्य तपासणी करून सांस्कृतिक भवन या ठिकाणी त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते.
आजी आजोबांचा मुलगा मुंबईला कोरोना रुग्ण असून तो मृत पावल्याची बातमी डॉक्टरांना समजल्या नंतर या चार जणांना पुणे (औंध) येथे तपासणीसाठी पाठविले होते.मंगळवारी (ता. 19) सकाळी चारपैकी तीन जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.पानगे यांनी दिली. यानंतर तालुका तहसीलदार, पोलिस निरीक्षक,वैद्यकीय अधिकारी यांनी कवठे येमाई गावाला भेट देऊन सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
तसेच कवठे येमाई गाव व सभोवतालचा परिसर सील केला आहे.
Wednesday, May 20, 2020
मुंबई शहरातून शिरुर तालुक्यात आलेल्या आजी आजोबासह एका नातीला कोरोना.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment